संतांनाही रज-तम वातावरणापासून दूर रहाणे पसंत !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘मी गुरुवारी का बोललो नाही ? दूषित हवा विरळ होऊन शुद्ध हवेचा प्रवेश झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रवेश करणे बरे असते, नाहीतर आपले मनही विटाळून जाते. संत शुद्ध हवेवर जगतात आणि वासनेच्या लढाईपासून दूर असतात. कुठल्याही तर्‍हेचे विकल्प होऊ न देण्यासाठी त्यांनाही तशी काळजी घ्यावी लागते. मनाचे विकल्प किंवा कुठल्याही तर्‍हेचा मोह दूर फेकायचा असतो. साधूसंत समर्थ असले आणि भोवताली विटाळलेली हवा असली, तरी ‘तिलाही तोंड द्यावेे’, असे त्यांना वाटत नाही; म्हणून माझ्या मनाला कुठलाही विकल्प दूषित करू शकत नसला, तरी मुद्दाम होऊन कशाला विटाळलेल्या हवेचा संपर्क करायचा ?’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२०.१२.१९८७)


Multi Language |Offline reading | PDF