‘आर्टिकल १५’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही ! – अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

हिंदू जागरूक नसल्यामुळेच आज चित्रपट, नाटके, विज्ञापने आदींच्या माध्यमातून हिंदु धर्म, देवता, संत, ब्राह्मण यांची सातत्याने नालस्ती आणि विडंबन केले जाते. जन्महिंदू या धर्महानीकडे मनोरंजन म्हणून पहातात. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच हिंदुद्वेषी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, वृत्तवाहिन्या यांच्याकडून सातत्याने ही नालस्ती केली जाते. ही धर्महानी थांबण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

मुंबई – देशात बलात्काराच्या अनेक घटना घडतात. सर्वाधिक बलात्कार अन्य धर्मियांकडून होत असतात. असे असतांना ‘हिंदु धर्मीय बलात्कार करतात’, असे ‘आर्टिकल १५’ या हिंदी चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हिंदु धर्म आणि ब्राह्मण यांची प्रतिमा मलीन होण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती झाली. त्यामुळे हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी स्पष्ट केले. ‘अन्य धर्मांच्या विरुद्ध चित्रपट काढण्याचे यांचे धैर्य नाही; कारण अन्य धर्मीय आक्रमक आहेत; मात्र हिंदु धर्म सहिष्णु आणि शांतताप्रिय आहे. त्यामुळे चित्रपटनिर्माते अन्य धर्मियांकडून पैसे घेऊन हिंदु धर्माच्या विरोधात चित्रपट काढत आहेत’, असे परखड मत श्री. सेंगर यांनी व्यक्त केले आहे. ‘पद्मावत’, ‘पीके’, ‘मणिकर्णिका’, ‘जोधा-अकबर’ यांसारख्या चित्रपटांना करणी सेनेने विरोध केला होता.


Multi Language |Offline reading | PDF