रंकभैरव देवाच्या आरतीच्या दोन सहस्र प्रतींचे वितरण !

रंकभैरव देवाच्या आरतीच्या प्रतींच्या वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवर

कोल्हापूर, २४ जून (वार्ता.) – ‘करवीर महात्म्य’ ग्रंथात उल्लेख असलेल्या बिनखांबी श्री गणेश मंदिराजवळील रंकभैरव देवाच्या आरतीच्या दोन सहस्र प्रतींचे वितरण लेखापरीक्षक श्री. प्रकाश आगळे आणि श्री. राजेंद्र मकोटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. हे वितरण करवीर तालुक्यातील हसूर दुमाला गावचे नवदांपत्य सौ. वृषाली आणि श्री. वैभव पाटील, तसेच श्री. श्रीकांत गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF