भुसावळ येथे पोलिसांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाला अनुमती नाकारली

आयोजित आंदोलनासंदर्भात बजावली कलम १४९ ची नोटीस

नियमितपणे वैध मार्गाने आंदोलन करण्याचा हिंदूंचा घटनादत्त अधिकार पोलीस का नाकारतात ?

जळगाव, २४ जून (वार्ता.) – हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अन्यायकारक अटकेच्या निषेधार्थ २३ जून या दिवशी भुसावळ येथील अष्टभुजादेवी मंदिरासमोर आंदोलन करण्यात येणार होते. याविषयीची अनुमती येथील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांकडे मागण्यात आली; मात्र पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत अनुमती नाकारली. याविषयी काही म्हणणे असल्यास पोलीस उपअधीक्षकांना भेटण्यास सांगितले. अनुमती मागणार्‍या कार्यकर्त्यालाच उलट पोलीस प्रशासनाने आयोजित आंदोलनासंदर्भात (आंदोलन न घेण्याविषयी) सी.आर्.पी.सी. १४९ प्रमाणे नोटीस बजावली.

पोलीस उपअधीक्षकांना भेटून कार्यकर्त्यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्रात अन्य ठिकाणी या विषयावर आंदोलन करण्यास अनुमती मिळाली आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यास आम्ही उत्तरदायी राहू’, असे लिहून दिल्यास आम्ही अनुमती देऊ.’’ (धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी आतापर्यंत सर्व आंदोलने वैध मार्गानेच केली आहेत आणि या वेळी कोठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला नाही. असे असतांना नाहक कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून अनुमती नाकारणे, हे अन्यायकारक होय ! – संपादक)

जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलनास अनुमती मिळते; मात्र तालुक्याच्या ठिकाणी अनुमती न देणारे पोलीस प्रशासन !

याच विषयावर जळगाव येथे २८ मे या दिवशी आंदोलन घेण्यात आले. त्यास जळगाव पोलीस प्रशासनाने अनुमती दिली होती. २३ मे या दिवशी भुसावळ या तालुक्याच्या ठिकाणी आंदोलनास अनुमती मागितली असता ती कायदा-सुव्यवस्थेच्या कारणावरून नाकारण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF