पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून आत्महत्या करणार्‍याला वाचवतांना पोलीस शिपाई गंभीर घायाळ

पोलीस मुख्यालयाची इमारतही असुरक्षित !

नवी मुंबई – कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून योगेश चांदणे (वय ३० वर्षे) याने आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र पोलिसाने त्याला वाचवले. ही घटना २२ जून या दिवशी सकाळी घडली. इमारतीवरील पाण्याच्या टाकीवर चढून योगेश चांदणे याने आत्महत्येची धमकी दिली. पोलीस शिपाई स्वप्नील मंडलिक यांनी मागून जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. ते दोघेही इमारतीच्या गच्चीवर तोल जाऊन पडले. यात पोलीस शिपाई गंभीररित्या घायाळ झाले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF