अमुची झाली करुण कहाणी ।

परात्पर गुरु पांडे महाराज

‘२१.२.२०१९ या दिवशी, म्हणजे देहत्याग करण्याच्या ९ दिवस अगोदर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला साधनेविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘‘साधना म्हणजे सत्य जाणणे. कठपुतळीच्या खेळात त्यांना नाचवणारा सूत्रधार पडद्यामागे असतो. त्यामुळे आपल्याला ‘सूत्रधारापेक्षा कठपुतळ्याच नृत्य करत आहेत’, असे वाटते; मात्र पडदा बाजूला करून सूत्रधार पाहिल्यावर आपल्याला प्रत्यक्षातील सत्य समजते. त्याचप्रमाणे ‘आपण साधनेद्वारे रज-तमगुणी आवरणाच्या रूपातील मायेचा पडदा दूर करून सूत्रधाराला, म्हणजे चैतन्याला ओळखणे’, एवढेच आपले काम आहे.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मीसुद्धा एक कठपुतळी आहे आणि रज-तमगुणी आवरणाच्या रूपातील मायेच्या पडद्यामुळे मला सूत्रधार म्हणजे चैतन्य, म्हणजेच भगवंत दिसत नव्हता; मात्र गुरुकृपायोगानुसार साधना केल्यामुळे आमच्यामधील मायेचा पडदा दूर होऊन मला सूत्रधाररूपी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले.’ त्या प्रसंगी मला परात्पर गुरु पांडे महाराज यांनी वरील सूत्रावर आधारित कविता लिहिण्यास सांगितली आणि त्यांनीच मला स्फूर्ती देऊन माझ्याकडून पुढील कविता लिहून घेतली.

श्री. शिवाजी वटकर

कठपुतळीच्या खेळामधली ।
दिसती आम्हा राजा आणिक राणी ॥
सूत्रधार (टीप १) तो आम्हा दिसेना ।
अमुची झाली करुण कहाणी ॥ धृ. ॥

मायाजालाचा खेळ मांडला जगी ।
त्यासी भुलूनी झाली ।
आमची केविलवाणी स्थिती ॥ १ ॥

गुरुकृपायोगाचा (टीप २) मार्ग दाखवी गुरुमाऊली (टीप ३) ।
मग आम्हाला साधनेचा मार्ग सापडला ।
सुटण्या जन्म-मरणाच्या फेर्‍यांतूनी ॥ २ ॥

कठपुतळीच्या मागचा पडदा ।
गुरुकृपेने बाजूला सारता ।
दिसला आम्हा सूत्रधार तो चैतन्यमय चक्रपाणि ॥ ३ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने ।
सूत्रधार अवतरला भूवरी ।
महर्षि गाती त्यांची महती नाडीपट्टीच्या वाचनातूनी ॥ ४ ॥

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यासाठी ।
त्यांना अपेक्षित अशी सेवा करूनी ।
आशिष मिळण्या प्रार्थना करू श्रीचरणी ॥ ५ ॥’

टीप १ – भगवंत म्हणजेच चैतन्यशक्ती

टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कलियुगांतर्गत कलियुगात शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ साधनामार्ग

– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF