श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विविध अनुमतींसाठी अधिकृत अधिकार्‍याची नियुक्ती व्हावी ! – आमदार डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे

मुंबई, २३ जून (वार्ता.) – तापमान वाढत असल्यामुळे त्या अनुषंगाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील फरशा पालटण्याचे काम करावयाचे आहे; मात्र अशा छोट्या-छोट्या कामांसाठी मंदिर व्यवस्थापनाला पुरातत्व विभागाची लेखी अनुमती घ्यावी लागते. अधिकारी पालटत असल्यामुळे त्यांना मंदिराविषयी माहिती समजून घ्यावी लागते. त्यामध्ये होत असलेला विलंब लक्षात घेऊन मंदिराच्या कामांसाठी त्वरित अनुमती मिळावी, यासाठी पुरातत्व विभागाच्या एका अधिकृत अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी २१ जून या दिवशी विधान परिषदेमध्ये औचित्याच्या सूत्राच्या वेळी उपस्थित केला. ‘याविषयी शासनाने लक्ष घालावे’, अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.


Multi Language |Offline reading | PDF