मुसलमानांना स्वतंत्रपणे शैक्षणिक आरक्षण लागू करण्यासाठी विरोधकांचा सभागृहात गोंधळ

मुसलमानांचे लांगूलचालन न थांबवणारे विरोधक लोकशाही निरर्थक ठरवतात !

मुंबई, २३ जून (वार्ता.) – सर्व धर्मांतील मागासवर्गियांसाठी मुळातच शैक्षणिक आरक्षण मिळत असून त्यामध्ये मुसलमान धर्मातील मागासवर्गियांचाही समावेश आहे. असे असतांना मुसलमानांसाठी स्वतंत्र शैक्षणिक आरक्षण कशासाठी ?, असा प्रश्‍न उपस्थित करत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी संविधानानुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतरही विरोधकांनी मुसलमानांच्या शैक्षणिक आरक्षणाची मागणी लावून धरत २१ जून या दिवशी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे तालिका सभापती हुस्नबानू खलिफे यांना ५ मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शासनाने अद्यापही मुसलमानांच्या शैक्षणिक आरक्षणासाठी अध्यादेश का काढला नाही ?, असे आणि अन्य प्रश्‍न उपस्थित केले. यावर मंत्रीमहोदयांनी समर्पक उत्तरे दिली.

केवळ मतांच्या राजकारणासाठी विरोधकांकडून मुसलमानांच्या आरक्षणाची मागणी ! – विनोद तावडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले आहे. न्यायालयाने मुसलमानांच्या आरक्षणाविषयीचा निर्णय मी वाचला आहे. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीमध्ये याविषयीचे म्हणणे न्यायालय ऐकूण घेणार आहे. म्हणजे न्यायालयाने मुसलमानांच्या आरक्षणाला अनुमती दिली आहे, असे होत नाही. यापूर्वी आंधप्रदेश शासनाने मुसलमानांच्या ५ टक्के आरक्षणासाठी अध्यादेश काढला होता; मात्र न्यायालयाने ते रहित केले. केवळ मतांच्या राजकारणासाठी विरोधक मुसलमानांच्या आरक्षणाची मागणी करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF