नेहरू यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूच्या चौकशीचा आदेश दिलाच नाही ! – भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा आरोप

आता केंद्र सरकारनेच थोर देशभक्त श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

नवी देहली – इतिहास साक्षी आहे की, देशभरातून मागणी होत असतांनाही जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी दिला नाही, असा आरोप भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला. २३ जून या दिवशी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना भाजपकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या वेळी नड्डा बोलत होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा अन्य केंद्रीयमंत्री आणि भाजपचे नेते यांनी श्रद्धांजली वाहिली. वर्ष १९५३ मध्ये मुखर्जी यांचा श्रीनगर येथील कारागृहात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता.

नड्डा पुढे म्हणाले की, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यांच्या जीवनात जे कार्य केले, ते तत्कालीन परिस्थिती पाहता खूप मोठे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज बंगाल आणि काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहेत. देश श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलीदान कधीही विसरणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF