अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनावरील सुनावणी २५ जूनला होणार

पुणे, २३ जून (वार्ता.) – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनाची (अर्जाची) सुनावणी २५ जून या दिवशी होणार आहे. २३ जून या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. या वेळी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. त्यांना ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) वतीने अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी आणि अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंह उपस्थित होते. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता धर्मराज चंडेल आदी अधिवक्ता उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF