वैद्यकीय आस्थापन कायदा करण्याच्या संदर्भात अभ्यास करून निर्णय घेऊ ! – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आरोग्यमंत्र्यांना निवेदन सादर

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अजय संभूस

मुंबई, २३ जून (वार्ता.) – वैद्यकीय आस्थापन कायदा (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०) करण्याच्या संदर्भात अभ्यास करून निर्णय घेतो, असे आश्‍वासन आरोग्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले. या कायद्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभूस आणि श्री. अरविंद पानसरे यांनी श्री. शिंदे यांची भेट घेतली होती.

रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी केंद्रशासनाने वर्ष २०१० मध्ये ‘वैद्यकीय आस्थापन कायदा २०१०’ (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०) केला होता. त्या कायद्यानुसार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, वैद्यकीय चाचणी आदींचे समान-किमान दर निश्‍चित होणार आहेत; म्हणून हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची आवश्यकता आहे, हे आरोग्यमंत्रांच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी मंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना अभ्यास करून प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF