गोव्यात पारपत्राविना रहाणार्‍या परदेशी तरुणीविषयी माहिती नसणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे शोधणार ?

झोपलेले पोलीस !

‘कळंगुट (गोवा) पोलिसांनी २८.४.२०१९ च्या रात्री कळंगुट येथील वेश्याव्यवसाय चालत असलेल्या एका ‘गेस्ट हॉऊस’वर धाड घातली. विशेष म्हणजे या धाडीत पोलिसांनी अफगाणिस्तानातील वरिष्ठ शासकीय अधिकारी महंमद ओमर अरियन (वय २८ वर्षे) याला कह्यात घेतले. या वेळी पोलिसांनी उझबेकिस्तान येथील २ मुलींची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेली एक मुलगी पारपत्राविना गोव्यात वास्तव्यास असल्याचे या वेळी उघड झाले. पोलिसांनी या मुलीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF