काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव

योगगुरु रामदेवबाबा यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमित योग करतात. योग केल्याने ‘अच्छे दिन’ येतात. माजी पंतप्रधान नेहरू आणि इंदिरा गांधी याही कोणाच्या तरी नकळत योग करत होते; मात्र काँग्रेसची नंतरची पिढी योगापासून दूर गेली आणि तिथेच त्यांची राजकारणातील गणिते बिघडली. काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीका योगगुरु रामदेवबाबा यांनी केली. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वसिद्धतेसाठी बाबा रामदेव यांनी २० जून या दिवशी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी रामदेव बाबा यांनी योगासनेही सादर केली.


Multi Language |Offline reading | PDF