शबरीमला मंदिराजवळील प्रस्तावित विमानतळासाठी भूमी देणार नाही ! – केरळमधील ‘बिलिव्हर्स चर्च’

भाविकांच्या सोयीसाठी विमानतळ उभारण्याचे नियोजन

  • आता बिलिव्हर्स चर्चवाल्यांना कोणी ‘विकासविरोधी’ का ठरवत नाही ?
  • हिंदूंच्या संघटनेने ख्रिस्त्यांच्या संदर्भात असा निर्णय घेतला असता, तर एव्हाना पुरो(अधो)गाम्यांनी आकाश-पाताळ एक केले असते !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिराच्या जवळील पथनमथीट्टा येथील प्रस्तावित विमानतळासाठी राज्य सरकारला भूमी देणार नाही, असा पवित्रा केरळमधील ‘बिलिव्हर्स चर्च’ने घेतला. या विमानतळासाठी राज्य सरकारला भूमी न देण्याविषयीचे सूत्र जून मासाच्या शेवटी होणार्‍या ‘बिशप परिषदे’च्या बैठकीत मांडले जाणार आहे. शबरीमला मंदिराला भेट देणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी हे विमानतळ उभारण्यात येणार होते.

शबरीमला मंदिरात येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी पथनमथीट्टा येथे विमानतळ उभारण्याचा निर्णय केरळमधील साम्यवाद्यांच्या सरकारने घेतला आहे. ‘राज्य सरकारला विमानतळ उभारण्यास भूमी देऊ नये’, यासाठी ‘अंतर्गत’ दबाव आहे’, असे ‘बिलिव्हर्स चर्च’ने म्हटले आहे.

वर्ष २०१६ मध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी शबरीमला हे ठिकाण ‘जागतिक पर्यटन केंद्र’ बनवण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

(हिंदुद्वेषी साम्यवाद्यांनी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची धर्मस्थळे कधी ‘जागतिक पर्यटन केंद्र’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे का ? – संपादक) त्यासाठी नवीन विमानतळ बांधून ते वर्षभर उघडे ठेवण्याचाही मानस विजयन् यांनी व्यक्त केला होता. (यावरून साम्यवाद्यांच्या सरकारला भाविकांच्या सोयीसाठी नव्हे, तर ‘जागतिक पर्यटन केंद्रा’साठी विमानतळ निर्माण करायचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे आणि साम्यवाद्यांच्या भूलथापांपासून सावध राहिले पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF