वाहन परवान्यासाठी शिक्षणाची अट रहित ! – नितीन गडकरी

नवी देहली – समाजातील अशिक्षित किंवा अल्पशिक्षित युवकांना इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नाही; कारण वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी ८ वी इयत्ता उत्तीर्ण असणे बंधनकारक केले होते. आता केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ८ वी इयत्ता उत्तीर्ण असण्याचा नियम शिथिल केला आहे. देशातील वाहतूक क्षेत्रात सद्य:स्थितीत २२ लाखांपेक्षा अधिक वाहनचालकांची आवश्यकता आहे. त्यामुळे गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF