सकारात्मक आणि संतांचे आज्ञापालन करणार्‍या देहली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. कृतिका खत्री

‘कु. कृतिका खत्री मूळच्या जयपूर (राजस्थान) येथील असून त्या पूर्णवेळ साधना आणि सेवा करण्यासाठी देहली येथील सेवाकेंद्रात रहातात. त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्यांनी संतांनी सांगितलेल्या सूत्रांनुसार आचरण केल्याने त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती झाली. साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

कु. कृतिका खत्री

१. संतांचे आज्ञापालन करणे

१ अ. व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे देणे : ‘कृतिकाताईकडून व्यष्टी साधनेअंतर्गत काही सूत्रे पूर्ण झाली नसली, तरी ‘व्यष्टी साधनेचा आढावा देणे’ हे आज्ञापालन आहे’, हे लक्षात घेऊन ती व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे देण्याचा तळमळीने प्रयत्न करते.

१ आ. देहली येथे अधिक तापमान असतांनाही झोकून देऊन जिज्ञासूंना संपर्क करणे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी तिला अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाआधी झोकून देऊन जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा करायला सांगितली होती. ताई सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेल्या सूत्रांचे पालन करण्याचा प्रयत्न करते. देहलीत या कालावधीत तापमान अधिक असूनही तिने जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा मन लावून केली.

२. सकारात्मकता

सद्गुरु पिंगळेकाकांनी ताईला तिच्याकडून सेवेत झालेल्या गंभीर चुका सांगितल्यावरही ती निराश न होता तळमळीने प्रयत्न करते.

३. रुग्णाईत असतांनाही रात्री आगगाडीने प्रवास करून राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी होणे

एकदा देहली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित केले होते. या वेळी देहली येथे साधकसंख्या अल्प होती. त्या वेळी कृतिकाताई घरी जयपूर येथे होती. तेथे असतांना तिला पुष्कळ ताप आला होता. अंगात ताप असलेल्या स्थितीतही कृतिकाताई राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या आदल्या रात्री जयपूरहून देहली येथे येण्यास निघाली. त्या वेळी तिने आगगाडीच्या सामान्य बोगीतूून प्रवास केला. त्या बोगीत प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. आगगाडी रेल्वेस्थानकावर थांबल्यावर ती ज्या बोगीतून प्रवास करत होती, ती बोगी जिथे फलाट (रेल्वे प्लॅटफॉर्म) नव्हता, अशा ठिकाणी आली. आगगाडी या स्थानकावर केवळ २ मिनिटेच थांबते. ताई उडी मारून बोगीतून खाली उतरली. या प्रसंगातून कृतिकाताईतील गुरुसेवेची तळमळ, दायित्वाची जाणीव आणि स्वतःचा विचार न करता झोकून देऊन गुरुसेवा करणे, असे अनेक गुण लक्षात आले.

४. त्रासावर मात करण्याची तळमळ

ताईला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्रासामुळे मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढल्यास ताई उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घेते.

श्री गुरूंनी असे सहसाधक देऊन त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. प्रणव मणेरीकर, देहली (१२.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF