‘आर्टिकल १५’ चित्रपटातून जातीच्या आधारे समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ! – अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदेकडून आरोप करत नोटीस

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) चित्रपटांना प्रमाणपत्र देतांना या गोष्टी लक्षात कशा येत नाहीत ? कि ते जाणीवपूर्वक अशा गोष्टींना मान्यता देते ?

नवी देहली – ‘आर्टिकल १५’ या आगामी हिंदी चित्रपटातून जातीच्या आधारे समाजामध्ये फूट पाडण्याचा आणि ब्राह्मणांचा अवमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदेने केला आहे. परिषदेने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यातील संबंधित भाग वगळण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ ३० मे या दिवशी प्रसिद्ध झाला होता आणि २८ जून या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

१. चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये उच्च जातीच्या लोकांकडून खालच्या जातीच्या महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह त्यांच्या हत्या करण्याचा उल्लेख आहे, तसेच जातीवर आधारित संवाद आहेत, असे दिसून आले. त्यामुळे या परिषदेने याला आक्षेप घेतला आहे.

२. नोटीस मिळाल्यापासून २४ घंट्यांत संबंधित भाग काढण्याची मागणी परिषदेने केली आहे. हा भाग जर काढण्यात आला नाही, तर सत्र आणि दिवाणी कायद्यांद्वारे कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF