हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांच्या मनात सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांच्याप्रती ओढ निर्माण होऊन आनंद मिळण्यासंदर्भात आलेल्या अनुभूती

श्री. आनंद जाखोटिया

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना चारचाकी गाडीतून रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी जातांना श्री. जाखोटिया यांच्या मनात कोणतेच विचार नसतांनाही मनात दाटून येऊन त्यांचा भाव जागृत होणे आणि ‘अशा प्रकारची अनुभूती पहिल्यांदाच आली’, असे त्यांच्या लक्षात येणे

‘मार्च २०१९ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (सद्गुरु काका) भोपाळ (मध्यप्रदेश) येथे दौर्‍यावर आले होते. त्यांचा दौरा पूर्ण झाल्यावर आम्ही त्यांना चारचाकी गाडीतून रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी जात होतो. मी सद्गुरु काकांच्या ‘सीट’च्या मागे बसलो होतो. सद्गुरु काका श्री. श्रीराम काणे यांच्याशी बोलत होते. त्या वेळी अचानकच सद्गुरु काकांविषयी माझ्या मनात दाटून येऊन भाव जागृत झाला. त्या वेळी खरेतर माझ्या मनात कोणतेच विचार नव्हते आणि ते जे बोलत होते, त्या सूत्रांमुळेही माझा भाव जागृत झाला नव्हता. अशा प्रकारची अनुभूती मला पहिल्यांदाच आली.

२. श्री. जाखोटिया यांच्या मनात ‘सद्गुरु काकांच्या शेजारी जाऊन नुसते बसूया’, असा विचार येणे आणि त्या वेळी हृदयामध्ये सद्गुरु काकांविषयी चुंबकासारखी ओढ निर्माण झाल्याचे जाणवणे

मे २०१९ मध्ये मी ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात गेलो होतो. तेव्हा दोन वेळा माझ्या मनात तीव्रतेने विचार आला, ‘सद्गुरु काकांच्या शेजारी जाऊन नुसते बसूया !’ त्या वेळी मला जाणवले, ‘माझ्या हृदयामध्ये सद्गुरु काकांविषयी चुंबकासारखी ओढ निर्माण झाली आहे. सद्गुरूंची कृपा आणि चैतन्य ग्रहण करण्यासाठी जीव आतूर होत आहे.’

३. स्वतःकडे सद्गुरु काकांशी बोलण्यायोग्य सूत्र नसतांनाही ‘केवळ त्यांना संपर्क करून त्यांचे चैतन्य ग्रहण करूया’, असे अनेकदा वाटणे

माझी सद्गुरु काकांशी पुष्कळ दिवस भेट झाली नाही किंवा माझे त्यांच्याशी काही दिवस बोलणे झाले नाही, तर अनेकदा माझ्या अंतर्मनात विचार येतो, ‘सद्गुरु काकांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करूया. खरेतर माझ्याकडे ‘त्यांच्याशी बोलायचे आहे’, असे कोणतेही सूत्र नसते; पण ‘केवळ त्यांना संपर्क करून त्यांचे चैतन्य ग्रहण करूया’, असे मला वाटते.

४. कृतज्ञता

ईश्‍वर सुचवत असूनही मी साधनेचे प्रयत्न करायला न्यून पडतो. माझ्याकडून सद्गुरूंचे आज्ञापालन होत नाही, यासाठी मी क्षमायाचना करतो आणि मला हा आध्यात्मिक आनंद दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. आनंद जाखोटिया, राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांचे समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (१३.६.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF