श्रीलंकेतील तमिळींच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेथील ‘तमिळ नॅशनल अलायन्स’ला निमंत्रण

  • ४ जणांच्या शिष्टमंडळात २ ख्रिस्ती

  • शिष्टमंडळात ख्रिस्त्यांचा समावेश अनुचित असल्याचे श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. सच्चिदानंदन् यांचे मत !

  • श्रीलंकेत बौद्धांकडून सर्वाधिक अत्याचार हा तमिळी हिंदूंवरच होतो. इतकेच काय, तर  तेथील तमिळी ख्रिस्तीही हिंदूंनाच छळतात. या पार्श्‍वभूमीवर श्रीलंकेतील तमिळी प्रश्‍न हा तेथील तमिळी हिंदूंशी निगडित आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळींचा प्रश्‍न सोडवण्यासाठी तेथील हिंदुत्वनिष्ठांशीच संपर्क करणे आवश्यक आहे !
  • भारत सरकारने ही सर्व सूत्रे लक्षात घेऊन श्रीलंकेतील तमिळी हिंदूंच्या सुरक्षेसाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, हीच समस्त हिंदूंची अपेक्षा आहे !
  • श्रीलंकेतील तमिळींसाठी कार्यरत असलेला राजकीय पक्षही तमिळी हिंदूंसाठी नव्हे, तर तेथील तमिळी ख्रिस्तींसाठी कार्यरत आहे, हे लक्षात घ्या !

कोलंबो (श्रीलंका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका दौर्‍याच्या वेळी श्रीलंकेतील तमिळींच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी श्रीलंकेतील राजकीय पक्ष ‘तमिळ नॅशनल अलायन्स’ला निमंत्रित केले होते. ‘तमिळ नॅशनल अलायन्स’ने यासाठी एका ४ सदस्यीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. या शिष्टमंडळातील सर्व जण श्रीलंकेच्या संसदेचे सदस्य आहेत; मात्र यातील २ सदस्य ख्रिस्ती आहेत. यामुळे श्रीलंकेतील तमिळी हिंदूंमध्ये अस्वस्थता आहे. ‘श्रीलंकेतील तमिळी हिंदूंची संख्या पहाता या शिष्टमंडळात २ ख्रिस्ती सदस्य असणे अनुचित आहे’, असे तेथील शिवसेनेचे नेते श्री. सच्चिदानंदन् यांनी म्हटले आहे.

शिष्टमंडळातील धर्मांध ख्रिस्त्यांच्या हिंदुविरोधी कारवाया !

या शिष्टमंडळामध्ये ‘तमिळ नॅशनल अलायन्स्’चे नेते आर्. संबंधन्, फेडरल पक्षाचे नेते सेनाथिराजा आणि अब्राहम सुमंत्रन् आणि तमिळ ईलम मुक्ती संघटनेचे नेते सेल्वम अदेकलनाथन् यांचा समावेश आहे. मन्नार क्षेत्रातून आलेले सेल्वम अदेकलनाथन् हे जन्माने ख्रिस्ती आहेत.

मन्नार येथील प्रसिद्ध पौराणिक शिवमंदिराच्या ठिकाणी गेल्या फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त उभारण्यात आलेले प्रवेशद्वार ख्रिस्ती पाद्य्राच्या नेतृत्वाखाली काही गुंडांनी तोडले होते. या वेळी सेल्वम अदेकलनाथन् यांनी या पाद्य्राला अटक होऊ नये, यासाठी साहाय्य केले होते. तसेच इतर गुंडांना जामिनावर सोडण्यास साहाय्य केले होते. या शिष्टमंडळातील आणखी एक सदस्य अब्राहम सुमंत्रन् हेही ख्रिस्ती आहेत. ते श्रीलंकेतील मॅथोडिस्ट चर्चचे उपाध्यक्ष आहेत. या चर्चने श्रीलंकेतील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले होते.

शिष्टमंडळातील धर्मांध ख्रिस्त्यांच्या समावेशामुळे हिंदुत्वनिष्ठ अप्रसन्न !

श्री. सच्चिदानंदन्

श्रीलंकेतील एकूण तमिळ लोकसंख्येपैकी ८५ टक्के हिंदू आहेत. या हिंदूंच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी ४ सदस्यीय शिष्टमंडळामध्ये २ ख्रिस्ती सदस्यांचा समावेश करणे योग्य नाही. भारतातील हिंदूंनी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगावे, असे आवाहन ‘श्रीलंका शिव सेनाई’ संघटनेचे संघटक मरवनपुलावू सच्चितानंदन् यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF