मंदिरांना अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करणारे पोलीस मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यास का कचरतात ?

कूर्मगतीने कारवाई करणारे पोलीस !

‘ध्वनीप्रदूषणाच्या विषयी उर्वरित तक्रारींवर कारवाई करण्यास इतका विलंब का ?’, असा प्रश्‍न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले. वर्षभरात ध्वनीप्रदूषणाच्या नोंदवण्यात आलेल्या ३७७ तक्रारींपैकी केवळ ४३ तक्रारींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित तक्रारींच्या विरोधात ‘लवकरच कारवाई करण्यात येईल’, असे आश्‍वासन पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाला दिले. या वेळी कारवाईचा तपशील देण्यासाठी २ मासांचा कालावधी मागणार्‍या पोलिसांची न्यायालयाने तीव्र शब्दांत कानउघाडणी केली होती.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF