मिनी पाकिस्तान !

संपादकीय

‘मिनी पाकिस्तान’ म्हणजे ‘छोटे पाकिस्तान’ ! भारताची धर्माच्या आधारे फाळणी होऊन मुसलमानांसाठी ‘पाकिस्तान’ नावाचा देश निर्माण झाला, तर हिंदूंसाठी उर्वरित भारत होता. पाकने स्वतःला ‘इस्लामी राष्ट्र’ घोषित केले; मात्र भारताने म्हणजेच त्या वेळच्या सत्ताधारी काँग्रेस आणि तिचे प्रमुख नेहरू यांनी देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित केले. धर्माच्या आधारे फाळणी झाल्यानंतर भारतातील मुसलमानांनी पाकमध्ये जाणे आणि पाकमधील सर्व हिंदूंनी भारतात येणे अपेक्षित होते; मात्र मोहनदास गांधी यांच्यामुळे ते होऊ शकले नाही आणि मोठ्या संख्येने मुसलमान भारतातच राहिले. ज्या भागात ते बहुसंख्येने आजही रहात आहेत, त्याला केवळ हिंदुत्वनिष्ठच नाही, तर अन्य विचारांचे लोक आणि पक्ष त्या भागाला ‘मिनी पाकिस्तान’ संबोधतांना दिसतात. राजकीय पक्ष ते उघडपणे बोलत नाहीत; कारण त्यांना या मुसलमानांची मते जाण्याची भीती वाटत असते. याचे उदाहरण नुकतेच दिसून आले. बंगालची राजधानी कोलकातामध्ये २ ट्रकभरून आलेल्या धर्मांधांनी एका रुग्णालयातील २० हून अधिक डॉक्टरांना मारहाण केल्यावर देशात त्याचे पडसाद उमटले. मारहाण झालेल्यांपैकी काही डॉक्टर बिहारी होते. डॉक्टरांनी नंतर ७ दिवस संप केला; मात्र तरीही बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. उलट ‘बंगालमध्ये रहायचे असेल, तर बंगाली आलीच पाहिजे’, असे विधान केले.

बिहारी हिंदू वार्‍यावर !

हे विधान राज्यात बहुसंख्येने रहाणार्‍या बिहारी नागरिकांसाठी होते. यामुळेच बिहारमधील जनता दल (संयुक्त) पक्षाचे प्रवक्ते अजय आलोक यांनी त्वरित यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘बंगाल ‘मिनी पाकिस्तान’ झाले आहे’, असे म्हटले; मात्र त्यांच्या सत्ताधारी पक्षाने त्यांच्या या विधानाचा विरोध केल्याने त्यांनी त्यांचे विधान मागे घेत त्यांच्या प्रवक्तापदाचे त्यागपत्र दिले. ‘सत्य बोलण्यासाठी त्यांना शिक्षा मिळाली’, असे म्हणण्यापेक्षा, ‘बिहारी लोकांवर कितीही अत्याचार, अन्याय झाला, तरी धर्मांधांविषयी काहीही म्हणायचे नसते’, हे त्यांना शिकायला मिळाले. त्यांनाच नाही, तर अनेकांना हे शिकायला मिळाले असणार, यात शंका नाही. देशातील एखादी वस्तूस्थिती जरी दिसत असली, तरी त्यामुळे होणारे राजकीय लाभ-तोटे पाहिल्याविना त्याविषयी कोणतेही विधान किंवा कृती करणे टाळले पाहिजे, हीच राजकीय पक्षांची मानसिकता यातून लक्षात येते. मुळात बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) हा पक्ष केवळ मुसलमानांच्या मतांवर निवडून येत नाही, तर त्याला बिहारी हिंदूंचीही मते मिळतात, तरीही त्यांनी बंगालमधील बिहारींना वार्‍यावर सोडले. यापूर्वी बिहारमधील कनिष्ठ डॉक्टरांनी एकत्र येत बंगालमधील डॉक्टरांवरील आक्रमणाचा निषेध करत धर्मांधांवर कारवाई न केल्यास बिहारमध्येही संप करण्याची घोषणा केली होती. यातून सरकारने कोणताही धडा घेतला नाही. पुढील निवडणुकीत हे सूत्र बिहारच्या जनतेने लक्षात ठेवून सरकारला धडा शिकवल्यास आश्‍चर्य वाटू नये.

‘अखंड हिंदुस्थान’ हवे !

प्रत्येक राजकीय पक्षाला ‘मिनी पाकिस्तान’चा धोका माहिती आहे, तरीही त्यावर ते मौन बाळगून आहेत. राजकीय स्वार्थापोटी ते देशातही बहुसंख्य हिंदूंचा आणि त्याद्वारे देशाचा घात करत आहेत. देशातील ९० जिल्हे मुसलमानबहुल आहेत, तर काश्मीर, लक्षद्वीप ही राज्ये मुसलमानबहुल आहेत. इतर काही राज्यांत, उदा. उत्तरप्रदेश, बिहार, तेलंगण, केरळ या राज्यांत मुसलमानांची लोकसंख्या लक्षणीय आहे. येथे हिंदूंवर आक्रमणे होत असतात. तसेच जिहादी आतंकवादी कारवायाही होत असतात, हे आतापर्यंत अनेकदा समोर आले आहे. बंगाल काही वर्षांत मुसलमानबहुल राज्य झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे तेथील लोकसंख्येचा समतोल ढासळू लागला आहे. यातूनच तेथे हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. इतकेच नाही, तर जिहादी आतंकवाद्यांच्या कारवाया वाढू लागल्या आहेत. मदरशांमधून बॉम्ब बनवले जात आहेत, हे बर्धमान येथील घटनेवरून काही वर्षांपूर्वीच उघड झाले आहे. बंगालच्या बांगलादेशाच्या सीमेवर अनेक अवैध मदरसे आणि मशिदी बांधण्यात आल्या असून यातून बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना साहाय्य करण्यासह जिहादी कारवाया होत आहेत. हे जनता दल (संयुक्त)च्या प्रवक्त्याला ठाऊक होते. त्यामुळेच त्याने बंगालला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटले. ‘मिनी पाकिस्तान’मुळे काय होत आहे, हेही त्यांना ठाऊक आहे. देशात अशी अनेक ‘मिनी पाकिस्तान’ उद्या देशाच्या विरोधात उभी राहिली किंवा हिंदूंच्या विरोधात उभी राहिली, तर या देशात आणखी एक ‘मोठे पाकिस्तान’ निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम, जुनागड आदी मुसलमान नवाबासह देशातील शेकडो संस्थाने खालसा केली होती. अन्यथा भारताच्या भारतातच अनेक ‘मिनी पाकिस्तान देश’ निर्माण झाले असते आणि येथून जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरप्रमाणे शेजारील राज्यांमध्ये आतंकवादी कारवाया केल्या असत्या. तसेच तेथील हिंदूंचा वंशसंहार झाला असता. ही राज्ये हिंदूबहुल असल्याने तेथे नंतर काश्मीरप्रमाणे स्थिती निर्माण झाली नाही. काश्मीरमध्ये बहुसंख्य मुसलमान असल्याने ते राज्य जिहादी आतंकवाद्यांचे राज्य झाले आहे. त्याच्या संरक्षणासाठी भारताला मोठी किंमत प्रतिदिन मोजावी लागत आहे. त्या तुलनेत भारताला त्याचा काहीच लाभ होत नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे. काश्मीर खोरे खर्‍या अर्थाने ‘मिनी पाकिस्तान’ झाले आहे, तसेच आता बंगालही होऊ लागले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हे प्रत्येक भारतियाला आणि प्रत्येक राजकीय पक्षाला लक्षात आले, तर ते देशहित असेल, अन्यथा ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झालेच आहेत, तर बंगाल हे ९ वे राज्य ठरेल ! हे रोखण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवून ‘अखंड हिंदुस्थान’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे !


Multi Language |Offline reading | PDF