सोलापूरला पाणीपुरवठा करणार्‍या उजनी जलवाहिनीला गळती

गळतीमुळे सहस्रो लिटर पाणी व्यय

सोलापूर – शहराला पाणीपुरवठा करणार्‍या उजनी ते सोलापूर या जलवाहिनीला १७ जून या दिवशी सायंकाळी टेंभुर्णी महामार्गाजवळील वेणेगावच्या पुढे गळती लागली. त्यामुळे १८ आणि १९ जून या दिवशी शहराच्या अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

गळतीनंतर दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले, तसेच दुरुस्तीसाठी उजनी पंपगृहातील पंपही बंद करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर पंप चालू करण्यात येतील. त्यामुळे पाकणी केंद्रात पाणी येण्यास विलंब होईल. उजनी जलवाहिनीला गळती लागल्यामुळे वेणेगावजवळ पाण्याचे मोठे तळे साचले होते. सोलापूर शहरात पाणीटंचाई आहे, तसेच उजनीतून तिबार पंपिंग करून पाणीउपसा करण्यात येत आहे. या परिस्थितीत गळतीमुळे सहस्रो लिटर पाणी व्यय होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF