पाकिस्तानी क्रिकेट संघावर बंदी घाला

पाकिस्तानमधील नागरिकाचीच न्यायालयात याचिका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ब्रिटनमध्ये चालू असलेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने पाकचा पराभव केल्यानंतर पाकमधील एका क्रिकेटप्रेमीनेच ‘पाकिस्तानी संघावरच बंदी घाला’, अशी याचिका न्यायालयामध्ये केली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायाधीश गुजरनवाला यांनी या याचिकेची गांभीर्याने नोंद घेत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला एक नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये काय म्हटले आहे, ते समजू शकलेले नाही; मात्र यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही कठोर निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच पाकिस्तानी क्रिकेट व्यवस्थापनासह, प्रशिक्षक आणि निवड समितीमध्येही पालट केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF