काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या ५ आतंकवाद्यांना अटक

शोपियां (जम्मू-काश्मीर) – येथे पोलिसांनी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा प्रयत्न उधळून लावत हिजबुल मुजाहिदीनच्या ५ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून ‘आयईडी’ स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आणि सैनिक यांच्याकडून राबवण्यात येणार्‍या शोधमोहिमेच्या मार्गावर स्फोटके लावून आक्रमण करण्याची या आतंकवाद्यांची योजना होती.


Multi Language |Offline reading | PDF