आतंकवादी डॉ. झाकीर नाईक याला मुंबईतील विशेष न्यायालयाचा दणका

मुंबई – वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रसारक तथा आतंकवादी डॉ. झाकीर नाईक याला मुंबईतील विशेष पीएम्एल्ए न्यायालयाने ‘३१ जुलैपूर्वी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित व्हा अन्यथा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल’, अशी चेतावणी १९ जून या दिवशी दिली. याविषयी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) ‘डॉ. झाकीर नाईक याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात यावे’, यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता.

१ जुलै २०१६ या दिवशी बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका ‘कॅफे’वर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर डॉ. झाकीर नाईकचे नाव समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) डॉ. झाकीर नाईक याच्यावर आरोपही लावले होते. आतंकवाद्यांनी केलेल्या त्या आक्रमणात २० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.


Multi Language |Offline reading | PDF