महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी कलियुगाची भयानक लक्षणे !

येथे सांगितलेली कलियुगातील स्थिती पालटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! सनातन संस्था यासाठीच प्रयत्नरत आहे.

धनिकांना समाजात अधिक मान मिळणार असणे आणि धर्म अन् न्याय यांच्या संदर्भातही त्यांचीच शक्ती प्रभावी ठरणार असणे

वित्तमेव कलौ नॄणां जन्माचारगुणोदयः ।

धर्मन्यायव्यवस्थायां कारणं बलमेव हि ॥

– श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक २

अर्थ : कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल, त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील. धर्म आणि न्याय यांच्याबाबतीत शक्ती प्रभावी ठरेल.


Multi Language |Offline reading | PDF