४ आतंकवाद्यांना जन्मठेप, तर एकाची निर्दोष मुक्तता

अयोध्येतील वर्ष २००५ च्या आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

अयोध्या – येथे वर्ष २००५ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी  प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने ४ आतंकवाद्यांना आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्यावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली. शिक्षा झालेल्या चौघांना प्रत्येकी ४० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

१. ५ जुलै २००५ या दिवशी झालेल्या या आक्रमणामध्ये २ आतंकवादी ठार झाले होते. तसेच काही सुरक्षारक्षक घायाळ झाले होते. या प्रकरणी इरफान, महंमद शकील, महंमद नसीम, महंमद अजीज आणि फारूक हे ५ जण कारागृहात होते. त्यांपैकी महंमद अजीज याची मुक्तता करण्यात आली आहे.

२. आतंकवादी रामभक्त बनून अयोध्येत आले होते. त्यांनी या भागाची पाहणी (रेकी) केली होती. त्यानंतर टाटा सुमो गाडीने प्रवासही केला होता. आक्रमण करण्याआधी आतंकवाद्यांनी रामललाचे दर्शनही घेतले. त्यानंतर गाडीमध्ये बसून रामजन्मभूमी परिसरात ग्रेनेडद्वारे आक्रमण केले होते.


Multi Language |Offline reading | PDF