भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍या आणखी १५ अधिकार्‍यांना सक्तीची सेवानिवृत्ती

नवी देहली – केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने भ्रष्टाचार आणि लाच घेणे या प्रकारचे आरोप असणार्‍या १५ वरिष्ठ अधिकार्‍यांना सक्तीची सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडले आहे. यात मुख्य आयुक्त, आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त स्तरांवरील अधिकार्‍यांचा समावेश आहे. यापूर्वी १२ वरिष्ठ अधिकार्‍यांना अशाच प्रकारे सक्तीची सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात आले होते. ३० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आणि ज्यांचे वय ५० ते ५५ च्या मध्ये असेल, अशा अधिकार्‍यांना सरकार सक्तीची सेवानिवृत्ती घेण्यास सांगू शकते. (केवळ सेवानिवृत्त करणे पुरेसे नसून त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे धसास लावून त्यांना शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF