पैशापेक्षा साधकांना महत्त्व देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे साधकांवरील प्रेम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. चक्कर येत असल्याने रुग्णालयात गेल्यावर ‘पेसमेकर’ बसवावा लागेल’, असे समजणे, डॉ. मनोज सोलंकी यांनी याविषयी रामनाथी आश्रमात दूरभाष केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘साधक महत्त्वाचा आहे. लगेच शस्त्रकर्म करा. नातेवाइकांची वाट पाहू नका’, असा निरोप मिळणे

श्री. हेमंत सातपुते

‘नोव्हेंबर २०११ च्या मासात मला मधूनमधून चक्कर येत होती; म्हणून ३.१२.२०११ या दिवशी मी आणि श्री. नितीन चव्हाण खासगी रुग्णालयात गेलो. तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘यांना सरकारी रुग्णालयात घेऊन जा.’’ आम्ही दुपारी दीड वाजता मडगाव येथील ‘अ‍ॅस्पीलीओ’ रुग्णालयात गेलो. त्यांनी मला तपासल्यावर विचारले, ‘‘तुम्ही या स्थितीत चालत कसे आलात ?’’ मला हे गुुुरुकृपेनेच शक्य झाले. त्या वेळी माझ्या हृदयाचे मिनिटाला फक्त ३७ ठोके (पल्स रेट) पडत होते. त्यानंतर त्यांनी मला लगेच अतीदक्षता विभागात भरती करून घेतले. त्या वेळी डॉ. मनोज सोलंकी यांनी पुष्कळ साहाय्य केले. त्यांनी ‘पेसमेकर’(Pacemaker) बसवावा लागेल’, असे रामनाथी आश्रमात दूरभाष करून सांगितले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा निरोप मिळाला, ‘‘साधक महत्त्वाचा आहे. लगेच शस्त्रकर्म करा. नातेवाइकांची वाट पाहू नका.’’

२. साधकांनी चारचाकीतून दुसर्‍या रुग्णालयात नेणे आणि सायंकाळी त्या रुग्णालयात तात्पुरता ‘पेसमेकर’ बसवणे, ‘नातेवाईकही करू शकणार नाहीत’, असे साधकांनी साहाय्य करणे

‘हॉस्पीसीओ’ रुग्णालयात ‘पेसमेकर’ बसवण्याची सोय नव्हती. डॉ. सोलंकी यांनी चौकशी केल्यानंतर माझ्यावर ‘अपोलो’ रुग्णालयात शस्त्रकर्म करायचे ठरले. मला संध्याकाळी ५.३० वाजता ‘हॉस्पीसीओ’ रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. मी सायंकाळी ६.३० वाजता ‘अपोलो’ रुग्णालयात भरती झालो. तेथील आधुनिक वैद्यांनी जलद गतीने सर्व पूर्तता करून सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत मला तात्पुरता ‘पेसमेकर’ बसवला.

तेव्हा ‘परात्पर गुरु साधकांची किती काळजी घेतात !’, असे वाटून मला फार कृतज्ञता वाटत होती. त्या वेळी ‘नातेवाईकही करू शकणार नाहीत’, असे साधकांनी मला साहाय्य केले आणि प्रेम दिले. माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर मुंबईहून माझे भाऊ-वहिनी आले.

३. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे कायमस्वरूपी ‘पेेसमेकर’ बसवण्याच्या शस्त्रकर्माच्या वेळी त्रास न होणे

५.१२.२०११ या दिवशी मला कायमस्वरूपी ‘पेेसमेकर’ बसवण्याचे शस्त्रकर्म झाले. तेव्हा मला परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे काहीच त्रास झाला नाही. मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. हेमंत सातपुते, कोल्हापूर (१२.१२.२०१६)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक      


Multi Language |Offline reading | PDF