येत्या ८ वर्षांत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार

  • चीन आणि रशिया यांच्या तुलनेत एवढी लोकसंख्या सामावून घेण्यास भारताकडे तेवढा भूप्रदेश आहे का ?
  • भारतात हिंदूंची लोकसंख्या न्यून होत आहे आणि मुसलमानांची लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत आहे. यातून भारताची लोकसंख्या वाढल्यावर ती कोणाची वाढणार आहे, हे लक्षात येते ! अशा वेळी केवळ लोकसंख्या वाढणे देशासाठीच नव्हे, तर हिंदूंसाठीही धोकादायक आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने लवकरात लवकर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा बनवला पाहिजे !

नवी देहली – भारत येत्या ८ वर्षांत म्हणजे वर्ष २०२७ पर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार आहे. सध्या लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनला भारत मागे टाकणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता वर्ष २०११ च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी इतकी आहे, तर चीनची लोकसंख्या १३८ कोटी इतकी आहे. पुढील ३० वर्षांत जगाच्या लोकसंख्येत २०० कोटींपर्यंत वाढ होऊ शकते. वर्ष २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ७७० कोटींवरून ९७० कोटी होऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे. यांपैकी अर्धी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका या देशांमध्ये होण्याचा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF