वडगाव मावळ (जिल्हा पुणे) बार असोसिएशनकडून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध

वडगाव मावळ (जिल्हा पुणे), १८ जून (वार्ता.) – अधिवक्ता आणि अशील यांच्यामध्ये झालेले संभाषण गुन्हा ठरू शकत नाही अन् हा संवाद न्यायालयात कधीही सिद्ध होऊ शकत नाही. असे असतांना सीबीआयने हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करून अधिवक्त्यांवर अन्याय केला आहे, अशी भूमिका मांडत वडगाव मावळ बार असोसिएशनने १८ जून या दिवशी अधिवक्ता पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधाचा ठराव संमत केला. व्यावसायिक अधिवक्त्यांना संरक्षण देण्याची मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. जवळपास ५० अधिवक्त्यांनी स्वाक्षरी करून या निषेध ठरावाला पाठिंबा दिला.


Multi Language |Offline reading | PDF