बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रे आणि १८ वर्षांपासून अनधिकृत वास्तव्य करणे, हे पोलीसयंत्रणेला लज्जास्पद !

झोपलेले पोलीस !

‘भिवंडी (जिल्हा ठाणे) येथील शांतीनगर पोलिसांनी शहरात अनधिकृतपणे रहाणार्‍या ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. फंटोलेनगरमधून शहाबुद्दीन नोकीउल्ला अन्सारी, हारून खालिक शेख आणि नुरुद्दीन शमसुद्दीन अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. या तिघांकडून बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड आणि पोस्ट ऑफिसचे पासबूक जप्त करण्यात आले आहे. ही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे त्यांनी सरकारला भासवून सुविधा प्राप्त केल्याचे समोर आले आहे. १८ वर्षांपासून या तिघांचे अनधिकृत वास्तव्य या शहरात आहे, असे समजते.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF