अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरील घोषणा ! – बाळासाहेब थोरात, विधीमंडळ नेते, काँग्रेस

मुंबई, १८ जून (वार्ता.) – या अर्थसंकल्पामध्ये नवीन काही नाही. योजना त्याच आहेत; मात्र अधिक योजना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मागील ५ वर्षांत शेतकरी, कामगार हे अडचणीतच आले आहेत. शेततळ्यांची योजनाही तीच आहे. नवीन योजनेत काहीही पालट नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरील घोषणा आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली.


Multi Language |Offline reading | PDF