मुझफ्फरपूर (बिहार) येथे मेंदूज्वरामुळे १०८ हून अधिक मुलांचा मृत्यू

घटना घडून ९ दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट दिल्यामुळे लोकांचा विरोध

मुझफ्फरपूर (बिहार) – येथे आतापर्यंत मेंदूज्वरामुळे १०८ हून अधिक लहान मुले दगावली आहेत. या घटनेला ९ दिवस उलटून गेल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी येथील २ रुग्णालयांना भेट देऊन आजारी मुलांची चौकशी केली. त्यामुळे लोकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘उपचार योग्य रितीने केले जात नाहीत. प्रतिदिन मुलांचा बळी जात आहे. नितीश कुमार आता जागे झाले आहेत का ? त्यांनी परत गेले पाहिजे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांकडून देण्यात येत होत्या.

सरकारने मेंदूज्वर रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी १०० कोटी रुपये व्यय केले आहेत; तरीही या आजारावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात हा आजार होत असतो; मात्र एकाही रुग्णालयात या संदर्भात या काळात विशेष सुविधा निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासन यांनी निष्क्रीयता दाखवली आहे. त्यामुळे रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपचार करण्यास अडचणी येत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF