अ‍ॅसिड आक्रमणातील आरोपीची फाशीची शिक्षा रहित

मुंबई – सहा वर्षांपूर्वी मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे प्रीती राठी या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड आक्रमण केल्याच्या प्रकरणी अंकुर पनवार या आरोपीला सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रहित केली आहे.

प्रीतीच्या खुनाविषयी अंकुरला दोषी ठरवण्याच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले; मात्र अंकुरचे तरुण वय, त्याची नसलेली गुन्हेगारी पार्श्‍वभूमी अशी विविध सूत्रे लक्षात घेऊन न्यायालयाने त्याची फाशी रहित केली.

वर्ष २०१३ मधील घटना !

देहलीतील प्रीती राठी हिची शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधून नौदलातील लष्करी नर्सिंग सेवेसाठी निवड झाली होती. ती मुंबईतील कुलाबा येथील नौदल कार्यालयात सेकंड लेफ्टनंट म्हणून कामावर रुजू होण्यासाठी २ मे २०१३ या दिवशी गरीबरथ एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनस येथे वडिलांसमवेत उतरली. त्याच वेळी तोंडावर स्कार्फ आणि डोक्यावर टोपी घातलेल्या अंकुरने तिच्या अंगावर ज्वालाग्राही पदार्थ फेकले होते. त्यात गंभीर घायाळ झालेल्या प्रीतीचा नंतर मृत्यू झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF