ट्विटरवर चुकीची माहिती दिल्यावरून अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्यावर गुन्हा नोंद

नवी देहली – गुजरातच्या वडगाम मतदारसंघातील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात आरएमव्हीएम शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सामाजिक माध्यमातून एक शिक्षिका मुलांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यावर आमदार मेवानी यांनी ‘ही घटना आरएमव्हीएम शाळेतील आहे’, असे सांगत ट्वीट केले; मात्र व्हिडिओ ‘मिस्र स्कूल’मधील असल्याने मेवानी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. मेवानी यांनी ट्वीट केले होते, ‘हा प्रकार अत्यंत वाईट आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील सर्व गटांत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे शिक्षिका आणि शाळा दोन्ही बंद होतील. पंतप्रधान कार्यालयानेही सांगावे, हा काय प्रकार आहे ?’ वादानंतर मेवानी यांनी ट्वीट काढले.


Multi Language |Offline reading | PDF