सुलभीकरणाच्या नावाखाली ‘बालभारती’कडून संख्या वाचण्याच्या पद्धतीत पालट

जोडाक्षर न वापरता संख्या वाचण्याची सूचना

यातून गणिताची गुणवत्ता न्यून होणार नाही का ? मुलांना अवघड वाटते; म्हणून संख्या म्हणण्याच्या पद्धतीत पालट करण्याऐवजी मुलांना ते म्हणता यावे, यासाठी ‘बालभारती’कडून मुलांची तशी सिद्धता का करून घेतली जात नाही ?

पुणे, १७ जून – ‘बालभारती’कडून इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षापासून पालट करण्यात आला आहे. जोडाक्षर न वापरता संख्या वाचण्याचा पाठ गणिताच्या पुस्तकात असणार आहे. यानुसार संख्या वाचन करतांना ‘एकवीस ऐवजी वीस एक’, ‘त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन’, ‘त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन’, अशा प्रकारे संख्या वाचायला शिकवली जाणार आहे. या संदर्भात पाठ्यपुस्तकात शिक्षकांसाठी सूचना देण्यात आली आहे. जोडाक्षर असणार्‍या शब्दांमुळे मुलांच्या मनात गणिताची नावड किंवा भीती निर्माण होऊ नये; म्हणून अशी पद्धत अवलंबल्याचे सूचनेत म्हटले आहे. दोन्ही पद्धती पुस्तकात दिल्या जाणार आहेत. (दोन्ही पर्याय दिले, तरी अशा पद्धतीने मुलांना संख्या म्हणण्याची सवय झाल्यावर गणिताची भीती कशी न्यून होणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF