मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी

एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून खोडसाळपणा केल्याची पोलिसांची माहिती : धमकीच्या संदेशात ‘इसिस’चाही (इस्लामिक स्टेटचा) उल्लेख

खोडसाळपणा करण्यासाठी हिंदूंचीच मंदिरे ‘सॉफ्ट टार्गेट’ वाटतात का ? तसेच या घटनेत आरोपीचे नावही उघड करण्यात आलेले नाही. त्याने धमकीच्या संदेशात वापरलेले शब्द पहाता हा तरुण धर्मांध असावा, असा संशय जनतेला आल्यास चूक ते काय ?

मुंबई – प्रभादेवीतील श्री सिद्धीविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे; मात्र एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून खोडसाळपणाने हा प्रकार केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधील शौचालयात धमकीचा हा संदेश लिहिलेला आढळला.

या प्रकरणी ठाणे पोलिसांनी एका संशयित तरुणाला कह्यात घेतले आहे. हा तरुण विक्रोळीचा आहे. एका मुलीला त्रास द्यायचा होता; म्हणून त्याने हा सगळा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाने ‘गज्वा-ए-हिंद, दादर सिद्धीविनायक मंदिर बूम.. इसिस इज कमिंग, स्लीपर सेल इज अ‍ॅक्टिव्हेटेड’, असा धमकीचा संदेश लिहून त्याखाली मुलीचा भ्रमणभाष क्रमांक लिहिला होता. या संदर्भातील वृत्त प्रसारमाध्यमांवरून प्रसारित झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF