काश्मीरमध्ये सैन्यविरोधी आंदोलनांसाठी पाक अर्थपुरवठा करत होता ! – फुटीरतावादी आसिया अंद्राबी हिची स्वीकृती

  • काश्मीरमध्ये धर्मांध महिला या जिहादी आतंकवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून आतंकवादी कारवाया करत आहेत. महिला आतंकवाद्यांचा हा धोका लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !
  • आसिया अंद्राबी यांच्यासारख्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई केली, तरच काश्मीरमधील आतंकवादावर आळा बसेल !
  • पाकचा निःपात करणे का आवश्यक आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते !
आसिया अंद्राबी

नवी देहली – काश्मीरमध्ये सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात महिलांची आंदोलने घडवून आणण्यासाठी पाक अर्थपुरवठा करत होता, अशी स्वीकृती काश्मीरमधील फुटीरतावादी आणि आतंकवादी कारवाया करणारी आसिया अंद्राबी हिने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) अधिकार्‍यांना चौकशीच्या वेळी दिली आहे. या पैशांच्या बदल्यात ती ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ या तिच्या संघटनेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये महिलांकडून आंदोलने घडवून आणत होती.

१. वर्ष २०११ नंतर मलेशियात अंद्राबीच्या मुलाला शैक्षणिक खर्चासाठी परदेशातील जहूर वटाली (अहमद शाह) या दलालाकडून पैसा मिळत होता. (आसिया अंद्राबी काश्मिरी युवकांना जिहादी कारवाया करण्यासाठी चिथावते; मात्र स्वतःच्या मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवते. जिहादच्या वाटेवर चालणार्‍या धर्मांधांच्या हे लक्षात का येत नाही ? – संपादक) वटाली हवालाच्या प्रमुख दलालांपैकी १ असून त्याला पाकिस्तानकडून पैसा मिळतो.

२. मुस्लिम लीगचा नेता मसरत आलम याने पाकिस्तानी दलालांकडून हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये पैसे पाठवले होते. मसरत आलम हा काश्मीर खोर्‍यात दगडफेक करणार्‍यांचा नेता मानला जातो. त्यालाही अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF