ममता बॅनर्जी आणि कनिष्ठ डॉक्टर यांच्यातील चर्चेनंतर संप मागे

प्रत्येक रुग्णालयात एक पोलीस अधिकारी तैनात करण्यात येणार

कोलकाता – बंगालमध्ये गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांच्या संपावर १७ जून या दिवशी मुख्यमंत्री आणि कनिष्ठ डॉक्टर यांच्या चर्चा करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. या चर्चेमध्ये ममता बॅनर्जी यांनी राज्यातील प्रत्येक रुग्णालयात एक नोडल पोलीस अधिकारी तैनात करण्याला संमती दिली. तसेच प्रत्येक सरकारी रुग्णालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणीही त्यांनी मान्य केली. तसेच मारहाणीच्या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही ममता बॅनर्जी यांनी दिली. (मारहाणीसाठी २ ट्रक भरून आलेल्या धर्मांधांपैकी गेल्या ७ दिवसांत केवळ ५ जणांनाच अटक होते, यावरून ममता बॅनर्जी धर्मांधांना पाठीशी घालत आहेत, हे स्पष्ट होते ! – संपादक) संप मागे घेतल्यानंतर मारहाणीत घायाळ झालेल्या डॉक्टरांना मी भेटण्यास जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. (२ ट्रक भरून आलेल्या धर्मांधांनी २० डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटनेला १ आठवडा उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या डॉक्टरांना भेटत नाहीत, यावरून त्यांचे धर्मांधांविषयीचे प्रेम आणि हिंदूंविषयीचा द्वेष लक्षात येतो ! – संपादक) या बैठकीला प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रत्येकी २ प्रतिनिधी उपस्थित होते. तृणमूल सरकारने कनिष्ठ डॉक्टरांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य केल्या. या बैठकीचे प्रसारमाध्यमांकडून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF