पत्रकाराने काँग्रेसविषयी विचारलेल्या प्रश्‍नाने पृथ्वीराज चव्हाण गडबडले

विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावरून टीका केल्याचे प्रकरण

मुंबई, १७ जून (वार्ता.) – राजकीय लाभासाठी पैसे किंवा पद यांचे आमीष दाखवले जाते. आमीष दाखवून पक्षांतर हाही राजकीय भ्रष्टाचार आहे, अशा शब्दांत  पृथ्वीराज चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाविषयी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. याच वेळी पत्रकारांनी काँग्रेसमध्ये त्यांनी अन्य पक्षांतील नेत्यांना दिलेल्या प्रवेशाविषयी विचारले असता ते गडबडले. ‘याविषयी आचारसंहिता करणे आवश्यक आहे’, असे उत्तर देऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी विषयावर पदडा टाकला. विधीमंडळाच्या मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघात पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला.


Multi Language |Offline reading | PDF