लोकप्रतिनिधींनी राष्ट्राला तेजस्वी इतिहास शिकवावा !

(पू.) श्री. संदीप आळशी

‘जगज्जेते असलेल्या इंग्रजांवरही पूर्वी रोमनांनी ११०० वर्षे राज्य केले होते; मात्र स्वतंत्र झाल्यावर इंग्रजांनी आपल्या राष्ट्राला स्वतःच्या पराजयाचा इतिहास शिकवला नाही, तर स्वतःच्या विजयाचाच इतिहास शिकवला. एरव्ही अनेक बाबतींमध्ये इंग्रजांचे अनुकरण करणार्‍या आजपर्यंतच्या भारतीय राज्यकर्त्यांनी इतिहास शिकवण्याच्या बाबतीत इंग्रजांचा कित्ता गिरवला नाही. आपल्या देशाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सशस्त्र क्रांतीकारक आदींचा तेजस्वी इतिहास अगदी जरासा आणि क्रूर मोगल बादशहांसारख्या परकियांचा इतिहास पानेच्या पाने भरून दिलेला असतो !

जिजामातेने शिवबाला लहानपणी हिंदूंचा तेजस्वी इतिहास शिकवला; म्हणून पुढे शिवाजी महाराज तेजस्वी इतिहास निर्माण करू शकले. आजच्या पिढीला हिंदूंचा तेजस्वी इतिहास शिकवलाच गेला नाही, तर तिच्यात स्वाभिमान, राष्ट्रप्रेम, क्षात्रतेज, वीरता आदी गुण निर्माण होऊन ती तेजस्वी इतिहास घडवू शकेल का ? ‘राष्ट्राला त्याचा विजिगीषू इतिहास न शिकवणे’, हे राष्ट्रीय पापच आहे’, हे लक्षात घेतले पाहिजे ! भावी हिंंदु राष्ट्रात राष्ट्राचा तेजस्वी इतिहास शिकवला जाईल !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (१६.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF