विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांचा विधान परिषदेत आक्षेप

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे

मुंबई, १७ जून (वार्ता.) – ज्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना त्यांच्या पक्षाने पक्षातून काढले असल्याची निश्‍चिती मुख्यमंत्र्यांनी केली आहे का ?, असा प्रश्‍न उपस्थित करत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अप्रत्यक्षरित्या आक्षेप घेतला. यावर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, जेव्हा कोणी एखाद्या पक्षात राहून अन्य पक्षात प्रवेश करतो, तेव्हा हे सूत्र लागू होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:हून काँग्रेसचे त्यागपत्र दिले आहे. तसेच त्यांनी दिलेल्या सर्व सुविधाही त्यांनी सोडल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या उत्तराने या विषयावर पडदा पडला.


Multi Language |Offline reading | PDF