संस्कृत वृत्तपत्र ‘सुधर्मा’चे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

बेंगळूरू – जगातील सर्वांत जुने आणि बहुधा एकमेव संस्कृत वृत्तपत्र ‘सुधर्मा’ सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. म्हैसूरू येथून प्रकाशित होणार्‍या या वृत्तपत्राला पुढील वर्षी ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने व्यवस्थापन समितीच्या वतीने संस्कृत भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच या निमित्ताने २०० पानी स्मरणिका प्रकाशित करणार आहे.

१. वर्ष १९७० मध्ये संस्कृत विद्वान पंडित वरदराज अय्यंंगार यांनी संस्कृत भाषा लोकप्रिय करण्याच्या उद्धेशाने संस्कृत दैनिक ‘सुधर्मा ’ हे वृत्तपत्र चालू केले. प्रारंभी प्रतिदिन १ सहस्र प्रती काढल्या जायच्या. आज हा आकडा ३ सहस्र ५०० च्या वर गेला आहे.

२. वर्ष २००९ मध्ये त्याचे ‘ई वृत्तपत्र’ चालू करण्यात आले आहे. पंडित अय्यंंगार यांचे पुत्र के.व्ही. संपथ कुमार हे सध्या या वृत्तपत्राचे संपादक आहेत.

३. ‘सुधर्मा ’चे वर्गणीदार काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहेत. त्यांना वृत्तपत्र टपालाने  पाठवण्यात येते. जिल्हा वाचनालय आणि काही शैक्षणिक संस्था यांनाही हे वृत्तपत्र पोचवण्याची सोय करण्यात आली आहे’, अशी माहिती के.व्ही. संपथ कुमार यांच्या पत्नी आणि संस्कृत विद्वान जयलक्ष्मी के.एस्. यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF