विद्यार्थ्यांना बंद झालेल्या अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या

नागपूर विद्यापिठाचा भोंगळ कारभार !

नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील ‘पदव्युत्तर जनसंवाद (एमएमसी) अभ्यासक्रम’ वर्ष २००९ मध्ये बंद करण्यात आला; मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या जात आहेत. (विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी केल्याप्रकरणी नागपूर विद्यापिठातील संबंधित अधिकार्‍यांकडून हानीभरपाई वसूल करून घ्यावी आणि त्यांच्यावर कारवाईही करावी. – संपादक) पदवीमध्ये हा अभ्यासक्रम कोणत्या विद्याशाखेच्या अंतर्गत येतो हेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

१. वर्ष २०१५ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एम्.ए. इन कम्युनिकेशन’ची पदवी देण्यात आली असून २०१६ आणि २०१७ मध्ये परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र ‘एमएमसी’ची पदवी देण्यात आली आहे.

२. या अभ्यासक्रमाला वर्ष २०१६ मधील पदवीत ‘सोशल सायन्स’चा तर, वर्ष २०१७ मधील पदवीत ‘इंटरडिसिप्लिनरी’ विद्याशाखेचा भाग दाखवण्यात आले आहे, तसेच सर्व पदव्यांमध्ये ‘ग्रेड’ ऐवजी ‘सीजीपीए’चा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र परीक्षा आणि विद्या विभाग याविषयी अनभिज्ञ आहे.


Multi Language |Offline reading | PDF