अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना नवी मुंबईतील सिडकोचे दोन अधिकारी अटकेत

सर्व रक्कम भ्रष्टाचार्‍यांकडून वसूल करून त्यांना कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

नवी मुंबई – अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी दहा लक्ष रुपयांच्या लाचेची मागणी करून अडीच लाख रुपये खासगी व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारतांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिडकोच्या दोन अधिकार्‍यांसह अन्य एकाला अटक केली आहे. प्रीतमसिंग भरतसिंग राजपूत आणि विकास किसन खडसे अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF