विवाह न करता एकत्र रहाणार्‍या जोडप्यांतील महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार ! – देहली उच्च न्यायालय

नवी देहली – जर एखादे जोडपे अनेक वर्षांपासून पती-पत्नीसारखे एकत्र रहात असतील, तर ते जोडपे विवाहबद्ध आहेत, असे समजले जाईल. त्यामुळे महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. सर्वोच्च न्यायालयाने कायद्यात तशी व्यवस्था केली आहे. कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, असे देहली उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी म्हटले. स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयात उच्च न्यायालयाने दखल देण्यास नकार दिला. पती-पत्नीसारखे एक जोडपे २० वर्षे समवेत राहिले होते. यावर निकाल देतांना स्थानिक न्यायालयाने प्रेयसीला प्रतिमहा ५ सहस्र रुपये उदरनिर्वाहसाठी (पोटगी) देण्याचे निर्देश दिले होते. या निकालाविरोधात याचिकाकर्त्याने (पतीने) न्यायालयात आव्हान दिले होते.


Multi Language |Offline reading | PDF