पुलवामामध्ये पुन्हा आतंकवादी आक्रमण होऊ शकतेे !

पाकिस्ताननेच भारताला दिली माहिती

  • पाकने अशी माहिती देण्यापेक्षा त्याच्या देशात चालू असलेले आतंकवाद्यांचे प्रशिक्षण तळ आणि आतंकवादी संघटना यांच्यावर कारवाई करून त्यांचा बीमोड करावा !
  • अशी माहिती देऊन पाक ‘आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात भारताला सहकार्य करत आहोत’, असे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ! पाकने दिलेली माहिती खोटीही असू शकते किंवा आतंकवादी दुसर्‍याच ठिकाणी आक्रमण करणार असतील, हेही नाकारता येत नाही !

श्रीनगर – पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे पुन्हा आतंकवादी आक्रमण होऊ शकते, अशी माहिती पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारताच्या उच्चायुक्तांना दिली. काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेला आतंकवादी झाकीर मुसा याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आतंकवाद्यांनी आक्रमण करण्याचा कट रचला असल्याचे पाकने म्हटले आहे. त्याने अमेरिकेलाही ही माहिती दिली आहे. माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. श्रीनगर येथील एका अधिकार्‍याने सांगितले की, आतंकवादी कोणत्याही वाहनात स्फोटके ठेवून स्फोट घडवू शकतात. यापूर्वी १४ फेब्रुवारीला या ठिकाणी आतंकवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवला होता. यात ४० हून अधिक पोलीस हुतात्मा झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF