सतत आनंदी, तत्त्वनिष्ठ, प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असलेली रामनाथी आश्रमातील कु. अमृता मुद्गल

कु. अमृता मुद्गल

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अमृता मुद्गल ही एक आहे !

(वर्ष २०१७ मध्ये कु. अमृता मुद्गल हिची ५६ टक्के आध्यात्मिक पातळी होती.)

कु. अमृता मुद्गल ही सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून सेवा करते. तिचा आज तिथीनुसार वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अमृता मुद्गल हिला सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

कु. वैष्णवी माने

१. सेवेची तळमळ

‘कु. अमृताला सेवा करतांना खाण्या-पिण्याचेही भान नसते. ती झोकून देऊन सेवा करते. तिला प्रतिदिन प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेचा पाठपुरावा घेण्याची सेवा असते. ही सेवा विविध माळे चढून आणि उतरून करायची असते. तिचे पाय दुखत असतात, तरी ती हे आनंदाने करते. तिचे त्याविषयी काहीच गार्‍हाणे नसते. कु. अमृताला सेवांमुळे रात्री झोपायला पुष्कळ विलंब होतो, तरीही ती सकाळी लवकर उठून सेवेला जाते.

२. प्रेमभाव

कु. अमृताची सर्वांशी पटकन जवळीक होते. कोणाला काही साहाय्य हवे असल्यास ती सदैव तत्पर असते. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते. लहान मुलांनाही ती पुष्कळ आवडते. ती संत आणि साधक यांची पुष्कळ लाडकी आहे.

३. कु. अमृता लहान असूनही तिचे विचार प्रगल्भ आहेत. तिचे दृष्टीकोन चांगले असतात.

४. तत्त्वनिष्ठ असणे

एखाद्याचे काही चुकत असले किंवा तिला काही अयोग्य दिसले, तर ती लगेच त्याला सांगते. चूक सांगतांनाही ‘समोरच्याला वाईट वाटणार नाही’, याची ती काळजी घेते.

५. आनंदी असणे

कु. अमृताकडे पाहून फार चांगले वाटते. ‘ती अंतर्मुख आणि सतत देवाच्या अनुसंधानात असते’, असे जाणवते. तिला कितीही त्रास होत असला, तरी ती नेहमीच आनंदी दिसते.

६. अमृताचे दोष

मनमोकळेपणाचा अभाव, इतरांचे साहाय्य न घेणे

‘हे भगवंता तू मला अमृतासारखी आध्यात्मिक मैत्रीण दिलीस, त्यासाठी तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– कु. वैष्णवी माने (वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF