नेपाळच्या काही खासगी शाळांमध्ये ‘मंदारीन’ ही चिनी भाषा शिकवणे अनिवार्य

नेपाळमध्ये राजकीय हस्तक्षेप केल्यानंतर आता चीन तेथील संस्कृती आणि भाषा यांच्यावरही आघात करून नेपाळी हिंदूंना सांस्कृतिक गुलाम करण्याचा प्रयत्न करत आहे. हे पहाता भारताने याकडे गांभीर्याने पाहून हे रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये चीनने त्याची भाषा ‘मंदारीन’ (हा चिनी भाषेचाच प्रकार आहे. ७० टक्के चिनी लोक ही भाषा बोलतात.) शिकवल्यास संबंधित शिक्षकांचे वेतन देण्याचा प्रस्ताव नेपाळ सरकारकडे ठेवला आहे. यानंतर काही खासगी शाळांमध्ये मंदारीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे सांगितले जात आहे. नेपाळमधील ‘द हिमालयन टाइम्स’ या दैनिकाने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

नेपाळच्या शाळांसाठी अभ्यासक्रम बनवणार्‍या ‘करिकुलम डेव्हलपमेंट सेंटर’च्या निर्देशानुसार नेपाळमध्ये विदेशी भाषा शिकवली जाऊ शकते; मात्र ती अनिवार्य करता येऊ शकत नाही.


Multi Language |Offline reading | PDF